नीलगायीची चार चाकी वाहनाला धडक; तीन प्रवासी बचावले; निलगाईचा मृत्यू

Foto
पैठण (प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील हर्षी येथील पाझर तलावाकडून दादेगाव कडे सुसाट वेगाने सुटलेल्या नीलगाईने चार चाकी वाहनाला जोराची धडक दिली असून ही धडक इतकी जोराची होती की निळगाईचा जागीच मृत्यू झाला असून नवीन चार चाकी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चारचकी मध्ये असलेले पती-पत्नी व ड्रायव्हर बाल बाल बचावले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास एम एच २७ डीए, ४६५१ या चार चाकी वाहनामध्ये बसून पती-पत्नी पाचोड कडून पैठण कडे येत असताना त्यांच्या वाहनाला हर्षी तळापासून दादेगाव कडे सुसाट वेगाने सुटलेल्या नीलगाईने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होते की नीलगाय चार चाकी वाहनाला धडकून जागीच मरण पावली. तर धार चाकीचे मोठे नुकसान झाले असून चार चाकी तील प्रवासी थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळतात पाचोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.